Ad will apear here
Next
‘कॉमनवेल्थ’साठी सुष्मिता देशमुखची भारतीय संघात निवड
ठाणे : केरळमध्ये आयोजित केलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विटावा येथील सुष्मिता सुनील देशमुखने ४७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड होणार आहे. 

या स्पर्धा १७ जून २०१९ रोजी केरळला झाल्या. सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदकांसह ३२ पदकांची कमाई केली आहे. पॉवरलिफ्टिंगसारख्या क्रीडा प्रकारात एका सामान्य कुटुंबातील या मुलीने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली गरुडझेप आशादायी आहे. 

केरळ येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले. दुबईतील आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही उत्तम कामगिरी बजावली आहे. सध्या ती गोवेलीतील जीवनदीप कॉलेजमध्ये एमकॉमच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. कारभारी जिममध्ये तिचे प्रशिक्षण सुरू असून, प्रशिक्षक विनायक कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही यशाची शिखरे गाठली आहेत. 

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही खेळण्याची जिद्द सुष्मिताने सोडली नाही. तिला विटाव्यातील मराठा समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सुधागड तालुक्यातील वाघोशी येथील रहिवासी सेवा संघ, ठाणे, मुंबई, पुणे यांनीदेखील तिला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNKCB
Similar Posts
जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दाभोळकर यांची निवड ठाणे : वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा लिलया जिंकणारे संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणार्‍या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २० ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस डेडलिफ्ट पॉवरलिफ्टिरंग स्पर्धा होणार आहे
खाडे विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ग. वि. खाडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या.
‘स्पोर्ट्स रिव्हॉल्युशन’तर्फे चौघांना जीवनगौरव पुरस्कार ठाणे : स्पोर्ट्स रिव्हॉल्युशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेतर्फे या वर्षीपासून क्रीडा क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या जेष्ठ प्रशिक्षक आणि चालू वर्षात आपल्या खेळात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. संस्थेतर्फे यंदा ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक देव मेहता (मुंबई), परमजीत सिंग (ठाणे), किक बॉक्सिंग
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिलांमध्ये जागृती ठाणे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती होण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language